निकजोनासची अजब घोषणा ... देसी गर्ल प्रियांका चोप्राने फक्त बॉलिवूड नाही तर हॉलिवूडमध्येदेखील आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे . अलीकडेच तिचा ' द व्हाइट टायगर ' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.या चित्रपटातील प्रियांकाचा अभिनय पाहून जगभरात तिची स्तुती होत आहे . दरम्यान , तिचा पती निक जोनासनेही कौतुक केले आहे . त्याबद्दल प्रियांकाने एका मुलाखतीत वक्तव्य केले आहे.'व्हरायटी सर्किट पॉडकास्ट अवॉईस'मध्ये प्रियांका पती निक जोनासचे कौतुक करीत म्हणाली की , माझा नवरा परिपूर्ण आहे.जो कधीच चुकीच्या गोष्टी करीत नाही आणि यामुळेच आम्ही आणखी जवळ येतो . निकमुळे माझा स्वत : वरचा आत्मविश्वास आणखी वाढतो .
0 Comments