अभिनेत्री रिंकू राजगुरूने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर कायम केले आहे.ती सोशल मीडियावर सक्रिय असून सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.तसेच ती सोशल मीडियावर फोटोव व्हिडिओ शेअर करत असते . नुकताच तिने इन्स्टाग्रामवर साडीतील फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे . या साडीतील रिंकूचा हा मराठमोळा अंदाज चाहत्यांना खूप भावला आहे . रिंकूने साडीतील फोटो शेअर करत लिहिले की , साडी ही शाश्वत फॅशन आहे . तिने ही साडी मकर संक्रांतीच्या निमित्ताने नेसली होती . तिच्या साडीतील फोटोंवरचाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत . इतकेच नाही तर या साडीतील एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे . तिचे साडीतील फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत .
0 Comments