राजकुमार रावने केले देसी गर्लचे कौतुक
... राजकुमार राव सध्या बधाई दो'च्या शूटिंगमध्ये व्यस्त असून लवकरच प्रियंका चोप्रासोबत तो द व्हाईट टायगर ' सिनेमात दिसणार आहे . प्रियंका चोप्रासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता आणि सेटवर ती तिच्या सहकलाकारांशी कशी वागते याबद्दल राजकुमार रावने खुलासा केला आहे . राजकुमार रावने प्रियंका चोप्राची स्तुती केली आहे . प्रियंका चोप्राविषयी बोलताना राजकुमार राव म्हणाला की , ती खूप मस्त आहे आणि एक तीग्लोबल स्टार असल्याचे सेटवर कोणालाच भासू देत नाही . मी नेहमीच तिच्या कामाचा एक मोठा चाहता आहे .
मोठ्या कलाकारांसोबत काम करण्यास मजा येते कारण यामुळे तुमचा परफॉर्मन्स जास्त चांगला होता . प्रियंकानेही माझ्या बाबतीत असेच काही केले . तिने माझ्या सीन्ससाठी मला मदत केली मी त्याच्याबरोबर आणखी काम करण्यास उत्सुक आहे :
0 Comments