करीनाच्या बाळाला भेटायला पोहोचली सारा अली खान, हातात दिसले गिफ्ट्स…
- Bollywood marathi news
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान यांना दुसऱ्यांदा पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. करीना कपूरला ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये लॉकडाऊन दरम्यान करीनाने आई होणार असल्याची बातमी दिली होती.
सध्या सोशल मीडियावर सारा अली खानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सारा करीनाच्या घरी जाताना दिसत असून तिच्या हातात खास बाळासाठी आणि करीनासाठी भेटवस्तू असल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ विरल भैय्यानी यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.करीना आणि सारा या दोघीं खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. बऱ्याच वेळाया दोघीही त्यांच्यातील नात्याविषयी उघडपणे व्यक्त झाल्या आहेत. करीनानेही साराला तिच्या पहिल्या चित्रपटासाठी मदत केली होती. विशेष म्हणजे सारा आणि तैमुर या दोघांमध्येही चांगली मैत्री आहे, सारा तैमुरच्या वाढदिवसानिमित्त नेहमीच वेगवेगळे फोटो शेअर करत असते आणि त्याला सोशल सोशल मीडियावर शुभेच्छा देखील देते.
2016 मध्ये जेव्हा करीना पहिल्यांदा गर्भवती होती, तेव्हा तिने त्या कालावधीत काम करण्याचा खूप आनंद घेतला होता.दरम्यानच्या काळात तिने अनेक जाहिरातींचे चित्रीकरण केले होते. बेबी बंपसह करिनाने रॅम्प वॉक केला होता. त्यावेळी तिचा हा रॅम्प वॉक अतिशय प्रसिद्ध झाला होता.
0 Comments