कन्यारत्नाच्या प्राप्तीनंतर विरूष्का प्रथमच मीडियासमोर अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली अलीकडेच आई - बाबा झाले आहेत . ११ जानेवारीला अनुष्काने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे . विराटने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांना ही गुडन्युज दिली होती . आई - बाबा झाल्यानंतर विराट आणि अनुष्का शर्माचा पहिला फोटो समोर आला आहे . अनुष्का आणि विराट क्लिनिकमधून निघताना काही फोटो समोर आले आहेत . ज्यात ती पूर्वीसारखी फिट अँड फाइन दिसते आहे . या फोटोंमध्ये अनुष्काने डेनिम जीन्स आणिशर्ट घातला आहे ज्यामध्ये ती खूपच मस्त दिसत आहे तर विराटने ब्लॅक कलरचा शर्ट घेतला आहे . दोघेही फोटोग्राफरवर पोज देताना दिसतायेत .
0 Comments