मेहंदी रंगली गं ... मराठी सिनेसृष्टीत सध्या सनई चौघड्यांचे सूर ऐकू येत आहेत . अभिज्ञाभावे , आशुतोष कुलकर्णीनंतर , मानसी नाईक आणि आता अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांच्याही लग्नाचे सूर ऐकायला मिळत आहेत . सिद्धार्थ आणि मितालीची हळद आणि संगीत सेरेमनी नुकतीच पार पडली . त्यांनी त्यांच्या हळद आणि संगीत सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते आणि आता त्यांनी त्यांच्या मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत . सिद्धार्थने शेअर केलेल्या फोटोंमध्ये मिताली आणि त्याच्या तोंडावर हास्य पाहायला मिळत आहे . तसेच एका फोटोत सिद्धार्थसोबत त्याची आईदेखील दिसत आहे .
0 Comments