अक्षय कुमारच्या ' ओह माय गॉड'चा सिक्वेलयेणार अक्षय कुमार सध्या बॅक टू बॅक सिनेमांमुळे चर्चेत आहे . आता अक्षय आणखी एक सिनेमा घेऊन येतोय . या सिनेमाचे नाव ऐकल्यानंतर चाहते एक्ससायटेड होतील हे नक्की तर या सिनेमाचे नाव आहे , ' ओह माय गॉड २२. होय , २०१२ मध्ये रिलीज झालेल्या आणि तुफान गाजलेल्या ' ओह माय गॉड ' या सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे . याची जोरदार तयारी सुरू आहे . लवकरच हा सिनेमा फ्लोअरवर येणार आहे . अक्षय कुमार व निर्माता अश्विनी वर्दे हे दोघे मिळून ' ओह माय गॉड २ ' प्रोड्युस करणार आहेत .
0 Comments