Header Ads Widget

Responsive Advertisement

बेबोला होणार मुलगी

 


         बेबोला होणार मुलगी


; ज्योतिषाची भविष्यवाणी !! बॉलिवूडची बेबो म्हणजेच करिना कपूर खान सध्या प्रेग्नंसी एन्जॉय करत आहे . करिना फेब्रुवारी महिन्यातच दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे . दरम्यान , करिनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे . या व्हिडिओमध्ये करिना डान्स करताना दिसत आहे.या व्हिडिओमध्ये करिना खूपच सुंदर दिसत आहे . तिने ऑरेंज कलरच्या फ्लॉवर स्लीव्ह टॉप आणि स्कर्ट परिधान केला आहे . गेल्या काही दिवसांपासून करिनाच्या प्रेग्नंसीबाबतच्या चर्चा सोशल मीडियावरही रंगत आहे . त्यातच करिनाला मुलगा होणार की मुलगी याकडेच तिच्या चाहत्यांचेही लक्ष लागले आहे . मध्यंतरी दिलेल्या एका मुलाखतीत करिनाला पहिले बाळ मुलगीच व्हावी अशी इच्छा होती पण मुलगा झाला तैमूर असे तिने सांगितले होते . त्यामुळे दुस - यांदा तरी मुलगी व्हावी अशी करिनाचीही इच्छा आहे . दरम्यान एका ज्योतिषीनेही करिनाचे दुसरे बाळ हे मुलगीच असेल अशी भविष्यवाणीच केली आहे .

Post a Comment

0 Comments